‘आयुष्यमान’ गैरव्यवहार प्रकरणात ईडीचे छापे   

२१ ठिकाणी कारवाई

रांची : केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी झारखंड, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील २१ ठिकाणांवर छापे घातले.
 
झारखंडचे माजी आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचे खाजगी सचिव ओम प्रकाश यांसह अन्य काहींच्या ठिकाणांवर ईडीने काल कारवाई करत झाडाझडती घेतली. 
जिल्हा समन्वयक आशीष रंजन यांच्या निवासस्थानातून १६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तर, ओम प्रकाश यांच्या घरातून दोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
 

Related Articles